मुंबई: देशभरातून केरळसाठी मदतीचा हात देण्यात येत आहे. यामध्ये उद्योगपती, खेळाडू, अभिनेते अशा सर्वांचाच समावेश असल्याचे दिसते. केरळमध्ये नागरिकांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पुरामुळे अनंकांचे प्राण गेले असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. बॉलीवूडचे शहंनशाह अमिताभ बच्चन केरळ पूरग्रस्तांना मदत जाहीर केली असून त्यांनी ५१ लाखांचा निधी दिला आहे. मदतीबरोबरच बच्चन यांनी येथील नागरिकांसाठी आपले काही कपडेही दिले आहेत. ६ पेट्या भरुन असलेल्या या कपड्यांमध्ये ८० जॅकेटस, ४० बुटांचे जोड, २५ पॅंट आणि २० शर्ट आणि काही स्कार्फ यांचा समावेश आहे
महानायक अमिताभ बच्चन यांची अभिनेत्यापलिकडे सेवाकार्यासाठी धावून जाणारे म्हणूनही खास ओळख आहे. त्यामुळे यानिमित्ताने त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.