शहंशाह अमिताभ बच्चनचे पाढेही वाचले जातील – सपना भवनानी

0

मुंबई : #Me Too ची साखळी सध्या वाढतच चालली आहे. एकामागे एक मोठमोठे सेलिब्रिटींचे नाव यादीत जोडले जात आहेत. बॉलीवूडचा शहंशाह अमिताभ बच्चनचं ही नाव पुढे येत आहे. अर्थात अद्याप कोणीही त्यांच्यावर आरोप केला नसला तरी त्यांच्या अन्यायाचे पाढेही लवकरच वाचले जातील असं सूचक टि्वट हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी केलं आहे.

एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी #Me Too मोहिमेबद्दल आपलं मत दिले होते . कोणत्याही महिलेशी अशा प्रकारचे वर्तन व्हायला नको, असे ते म्हणाले होते. यानंतर सपनाने त्यांच्यावर हल्लाबोल केला. मी टू बाबत आपली भूमिका मांडणारी पोस्ट अमिताभ यांनी लिहिली होती. ती शेअर करत सपनाने लिहिलं, ‘हे कदाचित जगातल सर्वात मोठं खोटं असेल. सर, पिंक सिनेमा प्रदर्शित होऊन गेलाय. तुमची कार्यकर्त्याची प्रतिमाही अशीच संपणार आहे. तुमचं सत्यही लवकरच बाहेल येईल.

टि्वटनंतर सिनेवर्तुळात एकच खळबळ माजली. आधी लोकांना सपना भवनानी हिच शोषणाची बळी आहे असं वाटलं. पण त्याबाबतही तिने स्पष्ट केलं की ‘मला अमिताभ यांचा कोणताही वाईट अनुभव आलेला नाही. पण त्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक गोष्टी मी स्वत: ऐकल्या आहेत. या महिला पुढे येतील अशी मला आशा आहे.’