जळगाव- विद्यापीठ, सहसंचालक कार्यालय आणि महाविद्यालये यांच्यात सुसंवाद साधून येणाºया अडचणी दूर करुन विद्यापीठाचा शैक्षणिक आलेख अधिक उंचावण्याचा निर्धार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मंगळवार, २१ रोजी झालेल्या सहविचार सभेत व्यक्त करण्यात आला. या बैठकीत महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने तातडीने परवानगी द्यावी अशी आग्रहाची मागणी करण्यात आली.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तूपे, कुलसचिव बी.बी.पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.ए.बी.चौधरी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.बी.डी.कºहाडड उपस्थित होते. साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. प्राचार्यांकडून उपस्थित झालेल्या सर्व शंकाचे निरसन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील व सहसंचालक डॉ.केशव तूपे यांनी केले.
रिक्त पदांमुळे शिक्षणाच्या दर्जावर परिणाम
बैठकी उपस्थित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी काही मुद्दे उपस्थित केले़ त्यामध्ये शासनाकडून रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असून तातडीने ही पदे भरली जावीत, तासिका तत्वावर उमेदवार भरताना रोस्टर प्रमाणे त्या संवर्गातील उमेदवार न मिळाल्यास इतर संवगार्तील उमेदवार भरण्यास मान्यता मिळावी, शौक्षणिक शुल्काचे नव्याने निर्धारण केले जावे, महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान मिळावे, शिष्यवृत्तीचे पैसे तातडीने दिले जावे, परीक्षांचे मानधन महाविद्यालयांना वेळेवर व त्याच आर्थिक वर्षात दिले जावे, महाविद्यालयांचे अॅकॅडमिक आॅडिट केले जावे, विद्यार्थी संसदेच्या निवडणूका होणार असतील तर विद्यापीठाने आचारसंहिता तयार करुन महाविद्यालयांना द्यावी, चॉईस बेस क्रेडिट प्रणालीमुळे कार्यभार वाढणार असेल तर तो मान्य केला जावा आदी विविध प्रकारच्या मागण्या उपस्थित प्राचार्यांतर्फे बैठकीत करण्यात आल्या़
शिष्यवृत्तीसाठी नवीन पोर्टल
महाविद्यालयांनी तातडीने त्यांच्या महाविद्यालयांचे अनुधारण करुन घ्यावे. यापुढे उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत दिल्या जाणाºया शिष्यवृत्ती संबंधितांना वेळेवर देण्यासाठी नवीन पोर्टल तयार करण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित होणार आहे. तासिका तत्वावर एखाद्या शिक्षकाची नेमणूक केल्यास आठवडयाला सात तासांपेक्षा अधिक तासिका दिल्या जावू नयेत असे डॉ.केशव तूपे यांनी प्राचार्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.