शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी समिती करणार प्रयत्न

0

यावल। येथील माध्यमिक कन्या शाळेत नुकतेच शिक्षक-पालक संघाची निवड करण्यात आली. यासाठी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापिका सुरेखा जावळे होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात आली.

तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना येणार्‍या अडचणींबद्दल भावना व्यक्त केल्या. बैठकीत नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षक – पालक संघाच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून महेमूद तडवी यांची निवड झाली. हेमलता शिवाजी अस्वार, हिरा सलीम तडवी, जयश्री युवाराज बारी, सविता जीवन नाफडे, सुनील कैलास पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पुष्पा आहिरराव, भारती नेहेते यांनी सहकार्य केले. शिक्षक-पालक संघाच्या नवनिर्वाचित सदस्यांनी येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, उपक्रमांचे आयोजन करण्यावर एकमत झाले. यावेळी निवड झालेल्यांचा सत्कार देखील करण्यात आला.