शैक्षणिक पुस्तके, इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट

0

नवी दिल्ली: कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील लॉकडाउन निर्बंधामधून गृह मंत्रालयाने एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार काही उपक्रमांना सूट देण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, शेती आणि वन क्षेत्रासाठी अतिरिक्त परवानग्यांबरोबरच, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांची दुकाने आणि इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे.

सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील लॉकडाउन निर्बंधामधून सरकारने शेती आणि वन क्षेत्रासाठी अतिरिक्त परवानग्यांबरोबरच, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांची दुकाने आणि इलेक्ट्रिक फॅन्सच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारतीय खलाशांना भारतीय बंदरांमध्ये ये-जा करण्यासाठी गृहमंत्रालयाने मार्गदर्शक तत्वेसुद्धा जारी केली आहेत. परंतु, हॉटस्पॉट आणि प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी वर नमूद केलेल्या सवलती लागू नाहीत. या क्षेत्रात या सवलतींना परवानगी नाही.