पुणे (सुशील कुलकर्णी): मराठवाड्यातून एका छोट्याश्या गावातून पुणे शहरात आलेले सामाजिक बाधिलंकी जपणारे मधुकर सरवदे केवळ समाजाचे देणे लागतो तसेच सामाजिक हित जपत जिद्दीच्या जोरावर ‘ज्ञानदायिनी’ शैक्षणिक व सामाजिक संस्था उभी केली. सुरूवातीला संस्थेने 2009मध्ये शिक्षा अभियान अंतर्गत रस्त्यांवर फिरणारी, शाळेत न जाणारी गरीब वस्तीवरील मुले या मुलासाठी त्याच्याचं वस्तीत जाऊन अभ्यास पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी अभ्यासिका सारखा उपक्रम राबवला आहे. त्यानां शिकवण्यासाठी, शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थीचे प्रशिक्षण वर्ग देखील घेतले. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेऊन दिले . अशा पद्धतीचा अवलंब करत संस्थेने अनेक मुलानां शैक्षणिक प्रवाहात आणले .याची दखल घेत पुणे महानगरपालिका ने संस्थाचे संस्थापक मधुकर सरवदे याचां विशेष सन्मान करण्यात आला.
संस्थेमध्ये 2009ते 2018 मध्ये 1ते10वी विद्यार्थी असून 2500 हून अधिक विद्यार्थीनी ना शिकवून त्यानां पायावर उभा करण्याचा प्रयत्न संस्थेनी केला आहे. पुण्यातून इंदिरानगर ,रामनगर ,तसेच गावाकडून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी संस्थेने हा उपक्रम राबवला. दरवर्षी वस्तीमधील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यचे मोफत वाटप करण्यात येते.मग यात दफ्तर ,कंपास, डबा वह्या या सारखे साहित्य देण्यात येते. मुलानां दहावी ला 80 टक्के पर्यंत ‘मुलानां दत्तक पालक योजना’ देखील राबवली जाते. संस्थेमध्ये शिकलेले आत्ता कोणी इंजिनिअर,शिक्षक तर काही जणस्वःताची सामाजिक संस्था चालवतात.हा उपक्रम चालू असतानाच काढवे/शिरकोली आदिवासी विद्यार्थीचे वास्तव त्याच्या समोर आले त्याच्या होणारा अन्याय दूर करण्यासाठी संस्थेचे सरवदे दापत्याने आदिवासी भागात जाऊन कपडे ,धान्य तसेच दिवाळीच्या दिवसात त्याच्याबरोबर साजरी करतात.गेले 5वर्ष न चुकता हा उपक्रम राबवला जातोय.
2011साली पूर्ण वर्षभर येवलेवाडी येथील कुष्ठरोग्याच्या मुलासाठी मुलानां मोफत शिकवण्याचे काम केले.संस्थेने 10 वी 12वी पास झालेल्या मुलानां चागंल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला.बेकार आणि अशिक्षीत लोकाना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.कुष्ठरोग्याना त्याच्या कुटुंब नाकारले म्हणून संस्थेने पालकाची भूमिका बजावत अजंठा-वेरूळ येथे दोन दिवसाची सहल काढत त्याच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला.अशा तळागाळातील समाजासाठी काम करणारी या संस्थेला आपणभेट देऊन काम समाजून घेऊन शक्य ती मदत समाज भान म्हणून नक्की करूयात.अशा चागंल्या सामाजिक संस्थेमुळे तळागाळातील समाज नक्कीच पुढे येईल.