पुणे । मार्केटयार्डातील हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षण सहाय्य निधी व शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले. महात्मा फुले जल चळवळ अभियानाचे संयोजक निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे राजेश कोंढरे उपस्थित होते. अजित सेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन साळुंके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देशात युद्धापेक्षा शिक्षणाची अधिक गरज आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण व जल संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य गिरमे, दत्तात्रय गायकवाड, प्रशांत यादव, राजेंद्र आटोळे, रवि अडसूळ उपस्थित होते.