शैक्षणिक साहित्याचे वाटप

0

नायगाव । माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दत्तक-पालक योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्याच्या नायगाव येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय आणि पंचक्रोशीतील आंबळे, पांडेश्वर, कोथळे, माळशिरस, पारगाव-मेमाणे या विद्यालयातील 110 गरजु, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

आजचे विद्यार्थी हे उद्याचे आपल्या देशाचे भविष्य आहे आणि त्याला शिक्षणासाठी कोणतीही कमतरता भासू नये यासाठी त्याला सर्वोपतरी सहकार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाईल, असे आश्‍वासन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी यावेळी दिले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, नायगाव तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष विलास खेसे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रकाश कड, मारुती पाटोळे, सदाशिव खेसे, रोहिदास कड, प्रदीप खेसे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.