शॉर्ट सर्किटने आठ लाखांचा ऊस जळाला

0

यावल- तालुक्यातील किनगाव येथे गट नंबर 38 मधील भूषण नंदन पाटील यांच्या शेतात मंगळवारी दोन वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉक सर्किटने साडेचार एकर ऊस जळून आठ लाखाचे नुकसान झाले. यावल पोलीस स्टेशनला याबाबत नोंद करण्यात आली आहे. तलाठी व मंडळ अधिकारी किनगाव यांनी या आगीचा पंचनामा केला.