जळगाव । मू.जे.महाविद्यालयातील संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा उपप्राचार्यांनी सत्कार केला. एस.पी.महाविद्यालय, पुणे यांच्यावतीने 2 व 3 फेब्रु. रोजी राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धा घेण्यात आली. यात राज्यातून 52 विद्यार्थी सहभागी होते. यामध्ये संस्कृत विभागाची अपेक्षा घाटे हिने ‘पर्यावरणपूरक पिंपळ’ याविषयी सादर केलेल्या प्रबंधाला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला.
तर पंकज वराडे याच्या ‘तपोवन – एक आदर्श पर्यावरणीय संकल्पना’ या प्रबंधाचेही परीक्षकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मू.जे.चे उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संस्कृत विभागप्रमुख डॉ.भाग्यश्री भलवतकर, प्रा.प्रीती शुक्ला उपस्थित होते. संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.