जळगाव । येथील डॉ. ऋषिकेश चौधरी (डी.एन.बी.गॅस्टोएन्ट्रोलॉजी, उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रथम तज्ञ) यांच्या शोभा सुपरस्पेशालिटी गॅस्टो आणि लिव्हर सेंटरचा अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर शुक्रवार 28 एप्रिल 2017 रोजी शुभारंभ होणार आहे. गॅस्टोएन्टोरोलॉजिस्ट डॉ. नागेश्वर रेड्डी आणि डॉ. मनु टंडन यांच्या शुभ हस्ते न्यु लाईफ हॉस्पिटल, जे.डी.सी.सी. बँकेच्या पुढे, हरिष स्वीट मार्ट समोर रिंग रोड जळगाव येथे ई उद्घाटन होणार आहे. डॉ. ऋषिकेश चौधरी यांचे शालेय शिक्षण ला.ना.विद्यालय, तर उच्च शिक्षण एम.जे.महाविद्यालयात, येथे झाले आहे. एम.बी.बी.एस. शिक्षण मुंबईत तर डीएनबी शिक्षण इंदौर येथे विविध शिक्षण घेतले आहे. अनुभव डीएनबी गॅस्टो ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा एशियन इन्स्टिटयुट ऑफ गॅस्टोएन्टेरोलॉजी, या देशातील सर्वोत्तम इन्स्टिटयुट मधून डॉ.नागेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झाल्यावरच एशियन इन्स्टिटयुट ऑफ गॅस्टोएन्टोरोलॉजी येथेच अॅडव्हान्स्टड एन्डोस्कोपीमध्ये तीन वर्षांचा अनुभव असून सातशे लहान आतड्याचे एन्डोस्कोपी असा अनुभव आहे.
हॉस्पीटलमध्ये या सुविधा उपलब्ध
अन्ननलिका, जठर, लहान व मोठ्या आतड्याचे आजार, निदान व उपचार, लिव्हर क्लिनिक-यकृताचे आजार उदा. काविळ, लिव्हर सिरॉसिस, हिपॅटायटीस बी अॅण्ड सी चे निदान, स्वादुपिंडाच्या पॅनक्रिआज आजारांचे निदान व उपचार, लहान व मोठ्या आतड्याचे आजार निदान व उपचार अल्सरेटिव कोलायाटीस, कोन्स टि.बी.आतड्यातील रक्तस्त्रराव पोटदुखी, गॅस्टोस्कोपी-अन्ननलिका व जठराची तपासणी कोलोनोस्कोपी-मोठ्या आतड्याची तपासणी इआरसीपी पित्तनलिका, लिव्हर व स्वादुपिंडाची ह्याची तपासणी. एन्टेरोस्कोपी-लहान आतड्याची तपासणी. कॅप्सुल एन्डोस्कोपी -स्पेशल कॅप्सुलद्वारे लहान आतड्याची संपूर्ण तपासणी. अॅडव्हान्स्ड् एन्डोस्कोपी (एनबीआय/एसपीआयइएस) आतड्याचे आजार व कर्करोगाचे वेळीच व अचुक निदान. ब्रेथ अॅन्ड गॅस अॅनालिसिस लहान मुलांनी गिळलेले नाणी, खिळे इत्यादी. पॉलिपेक्टोमी- आतड्यातील गाठी काढणे. पीइजी टयुब, प्लेसमेंट,आरगॉन प्लाझ्मा कोअॅग्युलेशन. असोफीजिअल डायलेटेशन व स्टेन्टींग आदि सुविधा उपलब्ध आहेत.