अमळनेर। शहरातील बोरी नदीच्या मोठ्या पुलावर शौचालयाचे काम आधीच झालेले असतांना अमळनेर नगरपालिकेने त्याच कामाची इ-निविदा प्रसिंद्ध केली आहे यातून संगनमताने पैसे गंडविण्याचा करण्याचा व अपहाराचा प्रयत्न दिसत असल्याने यांची चौकशी करून मुख्याधिकारी, अध्यक्ष व बांधकाम सभापतींसह संबंधित असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी तक्रार नगरसेवक प्रा. अशोक पवार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे
काय म्हटले आहे दिलेल्या निवेदनात?
नगरसेवक प्रा. अशोक पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, नगरपालिकेने 1 ऑगस्ट 2017 रोजी दिलेली इ-निविदा 2 ऑगस्ट रोजी एका दैनिकाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. यात तीन कामे दिलेली असून त्यापैकी 2 नंबरचे काम बोरी नदीच्या मोठया पुलाच्या उत्तर बाजूस शौचालय बांधणे असे आहे, त्याची अंदाजित किंमत 9 लाख 93 हजार 647 रुपये दिलेली आहे. परंतु दिलेल्या निविदेत शौचालयाचे जे ठिकाण दर्शविले आहे. त्या ठिकाणी शौचालयाचे काम 2016-17 या वर्षात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अर्धवट स्वरूपात झालेले दिसते. परंतु पालिकेत सत्तांतर झाल्याने शौचालयाचे काम अर्धवट सोडलेले आहे, असे असतांना पालिकेने उरलेल्या कामाचे इंस्टीमेट करून निविदा देण्याऐवजी प्रसिद्ध निविदेत शौचालयाची पूर्ण रक्कम दर्शविल्याने हि निविदा चुकीची व दिशाभूल करणारी असून जनतेच्या पैश्यांचा अपव्यय आहे.
झालेल्या कामांचे दिले पुरावे
या संदर्भात प्रा पवार यांनी झालेल्या कामांचे फोटोच पुरावे म्हणून सादर करीत यातून पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांचा संगनमताने पैसे हाडपण्याचा आणि अपहाराचा प्रयत्न दिसत आहे. याची गंभीर दखल घेऊन स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रा. पवार यांनी केली आहे. दरम्यान सदर प्रकरणामुळे विद्यमान सत्ताधारींची नैतिकता काय हे जनतेसमोर उघड झाले आहे, एकीकडे स्व खर्चातून योगदान देणारे आमदार शिरीष चौधरी व डॉ. रवींद्र चौधरी यांनी शहरात अनेक उपक्रम मार्गी लावले असतांना या पदाधिकार्यांनी झालेल्या कामाचेच पैसे लाटणे, हे शहराचे दुर्दैव असल्याचा आरोपही प्रा.पवार यांनी केला आहे.