शौचालयाच्या बांधण्यासाठी मुलांनी पाठविले पालकांना पत्र

0

भातखंडे । स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपुर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून हागणदारीमुक्तीकडे प्रशासनाची वाटचाल सुरु आहे. यासाठी शासनातर्फे अनुदान देण्यात येत आहे. अद्यापही शौचालयाचे बांधकाम अपुर्ण असल्याने जनजागृती करण्यासाठी नवनियुक्त जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या संकल्पनेतुन शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र पाठवित असून पत्राद्वारे भावनिक साद घालून शौचालय बांधण्याचे आवाहन करत आहे.

भातखंडे येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वीच्या वर्गातील विद्यार्थी शौचालयाचे महत्त्व या विषयावर पत्र लिहून पाल्यांना पाठवित आहे. मुख्याध्यापक जी.जे.पाटील व बी.एन पाटील यांनी विद्यार्थ्यांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी तीन गटात पत्र लिहिली त्यात पहिला गट ज्याच्याकडे शौचालय नाही असा, दुसरा गट ज्याच्याकडे शौचालय आहे आणि तिसरा गट की ज्याच्याकडे शौचालय आहे पण ते त्याचा वापर करत नाही या प्रमाणे गट तयार करण्यात आली आहे.