शौचालय अनुदानाच्या धनादेशासाठी टाळाटाळ

0

बोदवड । तालुक्यातील सुरवाडे बु. येथील लाभार्थीने वैयक्तिक शौचालय अनुदानासाठी अर्ज केला असता त्यांचा धनादेश मंजूर होऊन देखील ग्रामसेवकाकडून चिरीमिरीची मागणी केली जात असल्याची तक्रार जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. सुरवाडे बु.॥ येथील रमेश तुळशीराम कोळी यांनी शौचालयाचे बांधकाम केले आहे. याबाबत त्यांनी पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांना योजनेच्या धनादेशाबाबत विचारणा केली असता धनादेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र माळेगाव येथील ग्रामसेवक हे धनादेश देत नसल्याची तक्रार कोळी यांनी केली. ग्रामसेवकाकडून 1 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात चौकशी करण्यात येऊन योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी कोळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.