शौचालय अनुदानापासून वंचित; थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार

0

शिरपूर। वैयक्तिक शौचालय अनुदानापासून बलकुवा येथील ग्रामस्थ वंचित असल्याची तक्रार माधव दोरीक यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मात्र अद्यापही हे अनुदान न मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.दोरीक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, माझे व गावातील काही ग्रामस्थांचे शौचालयाचे बांधकाम हे जुन 2016 ला पूर्ण झाले असून अनुदान मिळण्यासाठी बलकुवे येथील ग्रामसेवकांकडे विनंती करून देखील अनुदान देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी 22 सप्टेंबर 2016 ला ग्रामसेवक यांना लेखी अर्ज देखील देण्यात आला आहे. तरी देखील कोणत्याही प्रकारची यात प्रगती दिसून आलेली नाही. याकामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत देखील तक्रार करण्यात आली आहे. बलकुव्या सारख्या गावातून मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट तक्रार दिल्यानंतर देखील अद्यापही कार्यवाही झालेली नाही.