शौचालय न बांधणार्‍यावर कारवाई करणार

0

शहादा । स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयाचे बाधकाम उदिष्ट जुन अखेर पुर्ण करणे पालिका शासनाला बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान घेतले असून दुसरा हप्ताचा अनुदान मिळाल्यानंतरही जर शौचालयाचा बांधकाम पुर्ण केला नाही तर कारवाई करण्यात येईल अशा इशारा जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिला. त्यांनी पदभार स्विकारल्या नंतर पहिलीच आढावा बैठक घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. शहादा नगरपालिकेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, नगरपालिका नियोजन अधिकारी शाताराम गोसावी, तहसिलदार मनोज खैरणार, नायबतहसिलदार डॉ.उल्हास देवरे आदी उपस्थित होते.

शहादा शहर व सुंदर करण्यासाठी पालिकेला दोन हजार 631 वैयक्तिक शौचालयाचे उदिष्ट देण्यात आले होते. त्या पैकी दोन हजार 332 शौचालयाचे बाधकाम पुर्ण झाले आहेत. ज्या प्रभागामध्ये काम अपुर्ण अवस्थेत असेल अशा प्रभागातील नगसेवकाना सोबत घेऊन काम पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळे दिल्या. रमजान महिना सुरू होत असल्याने मुस्लिम बांधवाचे शौचालय पुर्ण झाले पाहिजे त्यासाठी पालिका प्रशासनाने विषेश मोहिम राबविणे आवश्यक आहे. शासनाने गुंड मॉर्नीग पथक राज्य भर नेमण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने शहरातही गुंड मार्नीग पथक नेमुन उघड्यावर शौचास बसण्यास दंड आकारावा असा आदेश जिल्हाधिकारी यांनी पालिका प्रशासनाला दिला.