थायलंडमधील फनारत चाईबून शौचाला जाताना आता दोनदा विचार करेल. तिच्या घरातील कमोडवर ती बसली असताना कमोडमधून अचानक अजगर येऊन तिच्या पार्श्वभागावर हल्ला केला. त्यात ती जबरदस्त जखमी झाली आहे. दवाखान्यात ती स्वतः दाखल झाली पण डॉक्टरांना कळलेच नाही की साप तरी कोणत्या प्रकारचा असेल. तिच्या मुलीने पाहिल्यानंतर परंतु तो अजगर असल्याचे निश्चित झाले. न्यू न्यूझीलंड हेराल्डने ही बातमी दीली आहे. फनारतचे मेडिकल बिल ३४ हजार रूपयांवर पोहोचले आहे.