मुंबई : सायना नेहवाल बायोपिकमध्ये सायनाची भूमिका श्रद्धा कपूर निभावत आहे. या चित्रपटाच्या मार्गात अनेक अडचणी येत आहेत. आधी अनेक कारणांनी हा चित्रपट पुढे ढकलण्यात आल. पण शूटींग सुरू होऊन काही दिवस होत नाहीत, तोच पुन्हा एकदा हा चित्रपट रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याचे कारण, श्रद्धा कपूरला डेंग्यूने ग्रासले आहे. यामुळे श्रद्धाने चित्रपटाचे शूटींग थांबवले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून श्रद्धाची प्रकृती चांगली नव्हती. २७ तारखेला तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आणि चित्रपटाचे शूटींग थांबवण्याचा निर्णय तिने घेतला. तथापि येत्या दोनेक दिवसांत ती पुन्हा सेटवर परतण्याची शक्यता आहे.