नवी दिल्ली : श्रद्धेच्या मुद्द्यावर देशाचं विभाजन कऱण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत होता असा आरोप उमा भारती यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, हिंदू हा जगातील सर्वात जास्त सहिष्णू समाज आहे. माझी सर्व राजकारण्यांना विनंती आहे की, त्यांनी अयोध्येत राम जन्मभूमीवर मशीद बांधण्याची चर्चा करत हिंदूंना असहिष्णू करण्याचा प्रयत्न करु नये, असंही उमा भारती यांनी म्हंटले आहे. मंदिराच्या पायाभरणीसाठी उमा भारती यांनी काँग्रसे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रित केलं आहे. असं केल्याने त्यांच्या पक्षाला पापांचं प्रायश्चित करण्याची संधी मिळेल असा निशाना त्यांनी काँग्रेसवर साधला आहे.
राष्ट्रीय हिताचा हा मुद्दा असल्याने समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह, ममता बॅनर्जी, मायावती आणि डाव्या पक्षांनीही या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं पाहिजे असं मतही उमा भारती यांनी व्यक्त केलं आहे.