उचंदा। मुक्ताईनगर येथून जवळच असलेल्या नायगाव येथे दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने श्रामणेर शिबिराचे आयोेजन करण्यात आले आहे. समाजा-समाजात मैत्री व प्रेमाचे संबंध प्रवाहित होण्यासाठी बौध्द संघ भन्ते या रुपात श्रामणेर शिबिराद्वारे भन्ते यांना प्रशिक्षण देवून बुध्द धम्माची माहिती देण्यात येते. तसेच मानवाने मानवाशी कसे राहावे, याविषयी माहिती देण्यात येते.
शिबीरात यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाचे आयोजन सारिपुत्र गाढे, (बौध्दाचार्य) दिलीप पोहेकर यांनी केले असून कार्यक्रमास मुंबई येथील भन्ते अशोक किर्ती, सुमंगल अहिरे, के.वाय. सुरवाडे, जिल्हाध्यक्ष जयपाल बोदडे, जिल्हा परिषद सदस्य विनोद सोनवणे, सुभाष तायडे, शामराव मेघे, एन.जी. शेजोळे, दिलीप साबळे, डी.एस. तायडे उपस्थित होते. 2 एप्रिलपर्यंत धम्म मेळा असून सर्वांनी पांढर्या शुभ्र वस्त्रात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सारिपुत्र गाढे, दिलीप पोहेकर यांनी केले आहे.