श्रावणी काव्य स्पर्धा

0

चिंचवड । नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चिंचवड येथे श्रावणी काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपल्या दोन स्वरचित कविता आठ दिवसाच्या आत पाठविणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी विषयाचे बंधन नसल्याचे आयोजकांनी कळवले आहे. राजेंद्र घावटे, उपाध्यक्ष नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, कुसुमावर्त, प्लॉट 695, सेक्टर 18, चिखली प्राधिकरण, शिवतेजनगर, चिंचवड, पुणे या पत्त्यावर कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.