सिडनी । भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने ऑॅस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचे जेतेपद मिळवले. एकाच आठवड्यात त्याने सलग दुसरे सुपर सीरिज स्पर्धेचे जेतपद मिळवले आहे. ऑॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीकांतने ऑॅलिंपिक विजेता चेन लाँगला 22-20, 21-16 असे सरळ दोन गेममध्ये हरवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या गेममध्ये श्रीकांतले चेनने चांगली झुंज दिली. 20-20 असा बरोबरीत सामना झाल्यानंतर श्रींकातने सलग दोन गुण मिळवत पहिल्या गेममध्ये बाजी मारली. त्यानंतर दुसर्या गेममध्ये सुरुवातीला चेनने थोडीफार लढत दिली. मात्र अखेरच्या क्षणी श्रीकांतने खेळ उंचावताना 21-16 अशा फरकाने चेनवर मात केली.
यापूर्वीचे विजय
2014 चायना ओपन सुपर सिरीज, 2015 इंडिया ओपन सुपर सिरीज, 2017 इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज, 2017 ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज किदंबी श्रीकांतचे गप्री विजेतेपद, 2013 थायलंड ओपन सुपर सिरीज, 2015 स्विस ओपन सुपर सिरीज, 2016 स्येद मोदी ओपन सुपर सिरीज याप्रमाणे आपला विजय नावावर केला आहे.
गेल्या आठवड्यातील विजेतेपद
मागील आठवड्यातील सलग दुसरे जेतेपद आहे. गेल्या रविवारी त्याने इंडोनेशिया ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. एप्रिलमध्ये सिंगापूर ओपन स्पर्धेत श्रीकांत फायनलमध्ये पोहोचला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात श्रीकांतने इंडोनेशिया ओपन जिंकली. सुपर सीरिज स्पर्धेत सलग तिसर्यांदा फायनलमध्ये पोहोचणारा तो जगातील पाचवा खेळाडू ठरला होता. गेल्या पाच दिवसांमध्ये त्यानं जगज्जेत्या खेळाडूंना हरवले आहे. दरम्यान किदंबी श्रीकांतने हरवलेल्या लाँग चेंगने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. 24 वर्षीय किदंबी श्रीकांत हा गोपीचंदचा विद्यार्थी आहे. पी. व्ही. सिंधू, बी साईप्रणित यांच्यासह किदंबी श्रीकांत जागतिक पातळीवर कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. त्याच्या या खेळामुळे जगज्जेता खेळाडू लाँग चेंग यासारख्या बलाढ्य खेळाडूला चीत करण्यात यश मिळविले.
श्रीकांत खेळला असा खेळ
सुरुवातीपासूनच गेम खेळत राहिला आणि त्याने श्रीकांतच्या खेळाचे लक्ष वेधून घेतले. 11-9 अशी आघाडी घेऊन भारताची आघाडी ब्रेक झाली. श्रीकांतने पुन्हा एकदा दोन-बिंदू गाठले. त्याने 17-15 अशी आघाडी घेतली. मात्र लांब खेळपट्टीने त्याला मागे टाकले आणि 19 -17 अशी चार गुणांची कमाई केली. 18-17 ला लॉन्गने दोन-बिंदूंमधील अंतर उघडण्यासाठी मजबूत संरक्षण आणि अचूक आक्रमणांचा एक चांगला मिश्रण प्रदर्शित केला. जागतिक क्रमवारीत 11 व्या क्रमांकावर आक्रमण करून पुन्हा एकदा तीन सलग गुणांनी सामना करावा लागला. 20-19 अशी बरोबरी केली.