टोकियो : बॅडमिंटन खेळाडू किदांबी श्रीकांत जपान ओपन स्पर्धेमधून बाहेर पडला आहे.
श्रीकांतने सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये सुरुवात करत हा विजय निश्चित केला. मात्र, पुढील सलग २ सेटमध्ये दक्षिण कोरियाच्या लीने शानदार पुनरागमन केले. श्रीकांतने अनेकवेळा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. निर्णायक सेटमध्ये श्रीकांतने आघाडी घेतली, परंतु लीने जोरदार मारा करून २१-१८ ने श्रीकांतला मागे टाकले.