श्रीकृष्ण मंदिरात भाविकांचा 3000 पणत्या लावून दीपोत्सव साजरा

0

उरुळी कांचन । उरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्ताने भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण मंदिर दीपोत्सवाने साजरा करण्यात आला. येथे मातीच्या पणत्यांच्या दिव्यांनी मंदिरमधील परिसर प्रकाशमय झाला. यावेळी जेष्ठ नेते प्रा. के. डी. कांचन, माजी उपसरपंच पै. दत्तात्रय कांचन, मणीभाई देसाई पतसंस्थेचे संचालक शरद वनारसे, हरिश्‍चंद्र कांचन, माजी अध्यक्ष संतोष कांचन, जिल्हा महानुभाव परिषदेचे प्राचारमंत्री संजय वनारसे, संतोष चौधरी, उत्तम कांचन, शांतराम चौधरी, संजय कांचन, उत्तम चौधरी, अनिल ननावरे उपस्थित होते.

काकड आरतीची सांगता
परिसरात त्रिपुरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच सोरतापवाडी येथे देखील विविध कार्यक्रमांनी काकड आरतीची सांगता करण्यात आली. उरुळी कांचन येथील ग्रामस्वच्छता अभियान ग्रूपच्या वतीने मंदिरात 3000 पणत्या लावल्या होत्या. यामुळे मंदिर आणि परिसर तेजोमय झाला होता, तर राम मंदिरात विविध कार्यक्रमाने काकड आरतीची सांगता झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष माउली कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, प्रतिभा कांचन, भाऊसाहेब कांचन, विजय तुपे, जयश्री कठोरी, तुकाराम जगताप, बाळासाहेब सणस, मनीषा तुपे, अश्‍विनी कांचन यांसह मान्यवर उपस्थित होते. काकडआरती दरम्यान दररोज प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोरतापवाडी येथील मारुती मंदिरात काकड आरती निमित्ताने तुरे महाराजांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुरलीधर चौधरी, रामदास चोरगे, मनीषा म्हस्के, शारदा चौधरी, दामोदर चौधरी, अंजना चौधरी, नंदा चौधरी, बदामबाई चौधरी, रेखा चौधरी, बंडोपंत तिखे, नामदेव लोणकर, कमलबाई चौधरी यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातून गाव प्रदक्षिणा घालून काकडी आरतीची सांगता करण्यात आली.