श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिरात गर्दी

0

आंबेगाव –गर्द झाडी फुलांचा दरवळणारा सुगंध, समोर घोडनदी, मीनानदी आणि दक्षिण गुप्त गंगेचा त्रिवेणी संगम अन्य पाण्याचा पसरलेला प्रवाह, पक्ष्यांचा किलबिलाट निसर्गरम्य हिरवा शालू घालून नटलेला हा परिसर प्रतिभीमाशंकर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिर आशा सौंदर्याने नटले आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारी येथे संगमेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची व पर्यटकांची गर्दी होत आहे. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे घोडनदी, मीनानदी व दक्षिण गुप्त गंगेच्या त्रिवेणी संगमावरील संगमेश्वराचे प्राचीन मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून श्रावणी सोमवारी येथे देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची व शालेय मुलांची गर्दी होत आहे.

श्रावणी सोमवारी देवाची महापूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम होतात. या मंदिराशेजारी दत्तमंदिर असून या मंदिरा समोरील परिसर झाडांनी व फुलांनी तसेच विविध फळाच्या व नारळांच्या झाडांनी हा परिसर हिरवागार दिसत आहे. वर्षभर येथे भाविकांची व शाळकरी मुलांची गर्दी असते. शिवयोगी शैलज महाराजांनी भाविकांच्या देणगी रुपातून या परिसराचा विकास केला आहे. भाविकांना येथे राहण्यासाठी आणि धार्मिक कार्यक्रमासाठी भक्ती निवासाचे बांधकाम सुरू केले आहे.