श्रीगोंदा : भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी अत्यंत चुरशीची ठरलेली श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा २१०० मतांनी पराभव केला. आज सकाळी मतमोजणी झाली. भाजपाने ११ जागांवर विजय मिळविला तर आघाडीने ८ जागांवर विजय मिळविला.
नगरपालिकेसाठी काल ८४ टक्के मतदान झाले. २३ हजार ६०४ मतदारांपैकी १९ हजार ८५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीगोंदा नगरपालिकेसाठी १९ जागांसाठी ७१ उमेदवार मैदानात होते. नगराध्यक्षपदासाठी शुभांगी पोटे, सुनीता शिंदे आणि सिराबजी कुरेशी यांच्यात लढत होती.