श्रीगोंदा पोलिसांकडून 2 लाखांचा मद्यसाठा जप्त !

0
श्रीगोंदा- श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी तसेच काष्ठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी अचानक छापा मारून तब्बल 2 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक इशू शिंधू यांनी पदभार स्वीकारल्या पासून त्यांनी अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या कारवाया झाल्या आहेत त्यातच श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी तसेच तालुक्याची राजधानी काष्ठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक इशू शिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आज शनिवारी  श्रीगाेंदा कारखाना येथील गाेपाळवस्ती व काष्टी येथील जामदार मळा येथे अवैध गावठी हातभट्टी दारु तयार करणा_या भट्टयावर छापा टाकला असता दरम्यान 2 लाख 2 हजार किंमतीची हातभट्टी दारु एकुण 3970 लिटर जागीच नष्ट करुन हातभट्टी दारु तयार करण्याचे साहीत्य सामुग्री जागीच नष्ट केली आहे.छाप्या दरम्यान आराेपी नामे राहुल पाेपट गव्हाणे,अविनाश संताेष पवार ,अमाेल जंबाे गि-हे ,विमल जंबाे गि-हे ,जंबाे पंढरीनाथ गि-हे 6.. सुनिता अंकुश पवार रा.श्रीगाेंदा कारखाना ता.श्रीगाेंदा संदीप पाेपट्या पवार रा.जामदार मळा काष्टी अशांना ताब्यात घेवुन त्यांचेवर मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 (फ)(क)(ड)(ई) प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे..सदरची कारवाई मध्ये मा.पाेलीस अधिक्षक श्री.ईशु सिंधु साे.मा.अपर पाेलीस अधिक्षक श्री.सागर पाटील साे.मा.उपविभागीय पाेलीस अधिकारी श्री.अरुण जगताप साे.यांचे मार्गदर्शनाखाली   पाे.नि.दाैलतरावजाधव,पाेसई.सोमनाथ कर्णवर,पाेसई बाेडके,सहा.फाैज.भारती,पाेहेकाँ.खेडकर,पाेहेकाँ.बडे,पाेना.विकास वैराळ,पाेकाँ.टाके,पाेकाँ.रविजाधव,पाेकाँ.बाेराडें,पाेकाँ.आजबे,पाेकाँ.घाेऴवे,पाेकाँ.देवकातें,पाेकाँ.काेपनर,पाेकाँ.बेल्हेकर,पाेकाँ.दंदाडे,पाेकाँ.धांडेमपाेकाँ.वलवे, मपाेकाँ.बजंगे,मपाेकाँ. दीपाली भंडलकर व   महीला आर.सी.पी.प्लाटुन अ.नगर आदींचा समावेश होता