श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील नवगाम येथे आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला. यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहे. एक पोलीस कर्मचारी जखमी आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमेवरील दहशतवादी कार्यवाया वाढल्या आहे. भारतीय जवान देखील दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. मागील काही दिवसात भारतीय जवानांना अनेक दहशतवाद्यांना ठार करणायत यश आले आहे. परंतु दहशतवादी कारवाया सुरूच आहेत.