श्रीनगर – काश्मीरच्या पुलवामा भागात 9 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणार्या सीआरपीएफ जवानांना तेथील काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारले.
तसा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे. यावेळी या जवानाकडे शस्त्रे होती, मात्र त्याने त्याचा प्रतिकार केला नाही, याबाबत त्या जवानाने आपण लोकशाही मार्गाने या घटनेकडे पहात होतो, अशी प्रतिक्रीया त्या जवानाने दिली.