श्रीनगर भागात डीपीच्या दुरुस्तीमुळे विजेची समस्या सुटणार

0

भुसावळ। शहरातील श्रीनगर येथे नेहमीच कमी-जास्त दाबाने विज पुरवठा होत होता, वारंवार विज डीपीवरील डीओ तुटतात फ्यूज उडतात अशा तक्रारी वाढल्या होत्या. घरात असलेल्या विज उपकराणांमध्ये वारंवार बिघाड होतो आहे तसेच उपकरणे बदलवण्याची वेळ आली अश्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी त्वरित नविन डीपी बसवावी अथवा तिथे असलेल्या डीपी दुरुस्त तरी करावी अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत विज वितरणकडून डिपीची दुरुस्ती करण्यात आली, त्यामुळे आता या भागातील विजेचा प्रश्‍न सुटणार आहे.

झाडाच्या फांद्यांचा अडथळा केला दूर
श्रीनगर भागातील डीपी वरील डीओ वारंवार जातो, डीपी लावल्यापासून देखभाल केला गेला नाही. लोड नियोजन नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून नागरिक त्रस्त आहेत. मागील कित्येक वर्षापासून यांची दुरुस्ती रखडलेली आहे. तसेच श्रीनगर परिसरातील एलटी लाइन व 11 केव्ही लाइनला वृक्षांच्या फांद्या अडथळा ठरत होत्या.

वीज वितरणला दिले होते निवेदन
यामुळे स्पार्किंगचे प्रकार घडल्यास झाडाच्या फांद्यांनी पेट घेतल्याचे प्रकार याठिकाणी झाले होते. या सर्व समस्यांचा उद्रेक झालेला आहे हे लक्षात येताच तसेच साधारण एक वर्षाचा कालावधी झाल्यावर सुद्धा कारवाई केलेली नाही म्हणून शिवसेनेच्या वतीने प्रा. धिरज पाटील व परिसरातील नागरिकांनी विज वितरण कंपनीला मागील महिन्यात पुन्हा निवेदन दिले होते.

यांनी केली दुरुस्ती
शिवसेनेच्या व नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेत विज वितरण कंपनीतर्फे डीपीची दुरुस्ती करण्यात आली. खराब तसेच जळालेली सर्व साधन सामुग्री बदलण्यात आली. विज वितरण कर्मचारी समाधान कोतवाल, भुषण पाटील, विनायक सांभरे, निलेश ठाकरे यांनी नविन डीपी एमसिबी कनेक्टर व स्विचेस लावले. तब्बल चार तास परिसरातील विज बंद होती. वारंवार फ्यूज अथवा डियो जाणे या समस्या होणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.