अनेक गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी नाही
मावळातील 73 गावांमध्ये अंत्यसंस्कार उघड्यावर
वडगाव मावळ : मावळ परिसरामध्ये अनेक पिंपरी-चिंचवड सारख्या ‘श्रीमंत’ महापालिकेने पालिका अखत्यारीतील अनेक गावांमध्ये विकास घडवून आणला आहे. उघडी गटारे बंदीस्त झाली. बंद नळ जोड आले. रस्ते उत्तम तयार झाले. तरीही अनेक गोष्टींमध्ये हा विकास दिसून येत नाही. गटारे नीट काम करीत नाहीत, नालेसफाई, रस्ते तयार करणे आदी गोष्टी अजून बदल घडलेला नाही. मावळ तालुका अत्यंत जवळ असूनही या तालुक्यातील काही गावांमध्ये अद्याप स्मशानभूमीची सोय केलेली नाही. अनेक गावांमध्ये विकास घडवून आणला आहे, मात्र स्मशानभूमीची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे मावळातील 73 गावांत उघड्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या तालुक्यात 104 ग्रामपंचायती असून 184 महसूल गावे आहेत.
नागरिकांमधून संताप व्यक्त
पिंपरी-चिंचवड शहराच्याजवळ असल्याने जवळ असलेल्या मावळ तालुक्यात अनेक गावांमध्ये विकास झालेला नाही, असे येथील नागरिकांवर आलेली आहे. तालुक्यात मौरमार वाडी, पालेनामा, बेडसे, कुसवली, केवरे, चावसर, कुसूर, कोंडीवडे, कुसगाव, कुणा नामा, घेरेवाडी, धालेवाडी, पानोली, सावळा, कळकराई, आढाववाडी, मेडलवाडी, डोंगेवाडी, गोंटेवाडी, वाघेश्वर, कचरेवाडी, भाजगाव व अन्य अशा 73 गावांत स्मशानभूमी नाही. प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे आवश्यक असताना तब्बल 73 गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्मशानभूमी कधी उपलब्ध होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या स्मशानभूमीसाठी वारंवार संपर्क साधला जातो. नागरिकांकडून अर्ज दिले जात आहेत. येथील खासदार, आमदार, नगरसेवक आदींकडे वारंवार स्मशानभूमीसाठी मागणी होते आहे. नागरिकांकडून, समाजसेवी संस्थांनी अर्ज दिले आहेत. महापालिका आयुक्तांकडे, येणार्या नेत्यांकडे याबाबत सतत निवेदने दिली आहेत. तरीही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. आता पावसाळ्यात भरपावसात, उन्हात करण्याची वेळ गावोगावच्या नागरिकांवर आली आहे. तर काही ठिकाणी स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागात आजही 73 गावांत स्मशानभूमी नाही.
काही गावांना मंजुरी मिळाली
याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलेश काळे म्हणाले की, 2014-15 मध्ये नऊ गावांमध्ये स्मशानभूमीच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. परंतु जागा उपलब्ध नसल्याने खर्च करता आला नाही. जमिनीचे भाव वाढल्याने ग्रामस्थ जमीन देण्यास टाळाटाळ करतात. काही गावांचे प्रस्ताव पाठवले असून, काही गावांची मंजुरी आली आहे. लवकरच येथील स्मशानभूमीचे काम सुरू होणार आहे.