श्रीमती. शरदचंद्रिका सुरेश पाटील पदवी व पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये विश्व फार्मासिस्ट दिवस जोश आणि उत्साहात साजरा 

चोपडा ((प्रतिनिधी)

सालाबादप्रमाणे या वर्षीही आरोग्य सेवा प्रणालीमध्ये फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील व्यक्ती आणि समुदायांच्या कल्याणासाठी फार्मासिस्टच्या अमूल्य योगदानावर विचार करण्याची संधी प्रदान करतो. फार्मासिस्ट हे आरोग्यसेवा व्यावसायिक आहेत ज्यांना औषधांचा सुरक्षित आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते

या वर्षी, विश्व फार्मासिस्ट दिवस बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय चोपडा येथे जाऊन 50 व दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कॉलेज, चोपडा येथे 60 विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी केली .

तसेच पोस्टर, प्रश्नमंजुषा व इतर स्पर्धा महाविद्यालयामध्ये घेण्यात आल्या

संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप सुरेश पाटिल व सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगताद्वारे विश्व फार्मासिस्ट दिवस कार्यक्रमानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी सदैव केंद्रीत आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रबंधक प्रफुल्ल मोरे, सर्व विभाग प्रमुख , शैक्षणिक प्रभारी तुषार पाटील, . तन्वीर शेख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तसेच प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांनी बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय मा.

व्यवस्थापक विजय दिक्षित, प्राचार्य प्रीती मॅडम व दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कॉलेज, चोपडा येथील आदरणीय प्राचार्य डी. ए. सूर्यवंशी व सहकारी यांचे अनमोल सहकार्य लाभल्याने त्यांचे आभार व्यक्त केले