श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाला प्रारंभश्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाला प्रारंभ

0

पुणे । सर्व पितृ कल्याणार्थ पितृ पंधरवड्यात भागवत कथा हा सर्वोत्तम उपाय असल्याने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यानिमित्त रविवार पेठेतून शोभायात्रा काढण्यात आली होती. श्री राजस्थानी छ:न्याती विप्र मंडळाच्यावतीने गायत्री भवन येथे या ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ पारीख, मनोज पंचारिया, नारायण दायमा, दिनेश आसोपा, कृष्ण सारस्वत, हरिश खंडेलवाल, संतोष जोशी, राजेश व्यास, गोविंद दायमा, गोपाळ जोशी, सविता पारीख, सीमा पारीख, सपना ओझा, जयश्री शर्मा, प्रेमा खंडेलवाल, पूनम खंडेलवाल आदी सहभागी झाले होते. लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरु झालेल्या शोभायात्रेचा समारोप गायत्री भवन येथे झाला. डोक्यावर कलश घेऊन महिला यात सहभागी झाली होत्या. हरे कृष्णच्या जयघोषात ही शोभायात्रा निघाली होती. भागवत ज्ञानयज्ञ या सोहळ्यामध्ये 13 सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 7 यावेळेत श्रद्धेय पं. सुधीर उपाध्याय हे कथा सांगणार आहेत. शुकदेव परीक्षित चरित्र, प्रल्हाद चरित्र, नृसिंह अवतार, वामन अवतार, बाललीला, गोवर्धन पूजन, रासलीला, कंसवध, रुक्मिणी विवाह, सुदामा पूजन अशा अनेक कथा सप्ताहात होणार असल्याची माहिती रामभाऊ पारीख यांनी दिली.