श्रीरामाच्या जयघोषात रथोत्सवाला प्रारंभ

0

जळगाव– जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे 147 वर्षाची परंपरा कायम ठेवून कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त शुक्रवारी ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत वेदमंत्रघोषात ह.भ.प.मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते श्रीराम रथाचे महापूजन करुन प्रभु श्रीरामांच्या जयघोषात रथोत्सवाला प्रारंभ झाला.यावेळी श्रीराम रथावर पुष्पवृष्टी करण्यात असून उत्साहाचे वातावरण आहे.दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.

श्रीराम मंदिर संस्थानात पहाटे 4 वाजता काकडारती, प्रभु श्रीरामांच्या उत्सवमुर्तीस महाभिषेक, सकाळी 7 वाजता महाआरती,सकाळी 7.30 ते 8.30 सांप्रदायिक परंपरेचे भजन. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी 10.30 वाजता ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत वेदमंत्रघोषात ह.भ.प.मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते श्रीराम रथाचे महापूजन करण्यात आले.हभप.मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते श्रीराम रथाची महाआरती झाल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ झाला. रथोत्सवाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.रथाचे अग्रभागी समई,नगारा वादन,चौघडा,झेंडेकरी,बँन्डपथक,वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ सहभागी झाले आहेत.