श्रीराम जन्मभूमीत पूजेसाठी परवानगी द्या

0

एरंडोल । उत्तर प्रदेशातील आयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत कायम स्वरूपी पूजा करण्याची परवानगी हिंदूंना देण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने बसस्थानकाच्या मागील बाजूस आयोजित केलेल्या जनजागृती अभियान प्रसंगी केली. समितीच्या वतीने पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री याना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या. दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, आयोध्या येथील श्री राम जन्मभूमी कोट्यावधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे.उत्तर प्रदेशातील आयोध्या ही प्रभू रामाची जन्मभूमी असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने देखील सदरचे स्थळ राम जन्मभूमी असल्याचे आणि यापूर्वी त्याठिकाणी राम मंदिर असल्याचा निर्णय दिलेला आहे. मात्र त्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्यास अनुमती नाकारण्यात येत आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्‍या
केंद्र शासन उत्तर प्रदेश सरकारने आयोध्या येथे हिंदुना पूजा करण्यास कायमस्वरूपी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनावर हिंदू जनजागृती समितीचे विनोद शिंदे, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, शिवझेप प्रतिष्ठानचे संदीप फुलपगार, प्रल्हाद सोनावणे, रमेश महाजन, योगेश वाघ, गौरव वाणी, अक्षय साळी, मधुकर जाधव, विजय चौधरी, विजय भांडारकर, रवींद्र माळी, कृष्णा चौधरी, अनिल ठाकूर, मोतीलाल वाघ यांचे सह हिंदू जनजागृती समितिच्या पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.