जळगाव । श्रीराम नवमीनमित्त शहरातील प्रभ श्रीरामांच्या मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यातच मंदिरांमध्ये रामनवमीच्या पुर्वसंध्येला दिव्यांनी मंदिर सजविण्यात आल्याने सर्वत्र लखलखाट प्रकाश पसरला होता. दरम्यान, जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात श्रीरामजन्मोत्सवानिमित्त आज रामजन्मोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे. तर रात्री संस्कारभारती तर्फे गीत रामायण होणार आहे.
बांभोरी येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशिय संस्थेतर्फे ही रामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12.30 वाजता आ. राजुमामा भोळे, आ.स्मिता वाघ, नरेश खंडेलवाल यांच्या हस्ते आरती होवून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.