श्रीराम जन्मोत्सव उत्साहात; जलसंपदा मंत्र्याच्या हस्ते महाआरती

0

जळगाव: आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदू पटेल, महापौर सीमा भोळे आदी उपस्थित होते.