श्रीराम जन्मोत्सव सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

0

भुसावळ। शहरातील लक्ष्मी चौकजवळील पुरातन श्रीराम मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीरामचंद्र महाराज संस्थानतर्फे श्रीराम चौक यांच्या अध्यक्षतेखाली राम जन्मोत्सव सोहळा सप्ताहास सुरुवात करण्यात आली.

यामध्ये दैनंदिन कार्यक्रमात सकाळी 6 ते 9 अभिषेक, पुजा, आराधना, दुपारी 2.20 ते 4.30 राजगौंड समाज भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम, तसेच श्रीराम भजनी मंडळ व सत्यसाई सेवा समितीतर्फे रामायण व्याख्यानमाला घेण्यात आली. करुणा त्रिपदी परिभ्रम शाखेतर्फे भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. तसेच शनिवार 1 रोजी लक्ष्मी भजनी मंडळातर्फे कार्यक्रम होईल. रविवार 2 रोजी सकाळी 9 ते 11 गणपती अथर्वशिर्ष, दुपारी प्रल्हाद महाराज यांच्या हस्ते उपासना, सोमवार 3 रोजी आठवले भजनी मंडळातर्फे धार्मिक उत्सव, मंगळवार 4 रोजी सकाळी 10 ते 12 हभप नलिनीताई यांचे प्रवचन, व श्रीराम जन्म सोहळा विशेष कार्यक्रम होईल. तरी भाविकांनी या सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम चौक, विनोद शर्मा, राधेश्याम लाहोटी, जे.बी. कोटेचा यांनी केले आहे.