पाळधी। ये थील मंडळाचे कार्य कौतूकास्पद आहे. म्हणूनच अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे उत्कृष्ठ कामाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मंडळास मिळाले आहे. मंडळाच्या कार्याला माझा सलाम असा गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य फेस्कॉम मुंबईचे अध्यक्ष डी.टी.चौधरी पाळधी येथे झालेल्या 23 ऑगस्ट रोजीच्या शिबीरात काढले. जेष्ठांनी संघटीत व्हावे, शासनाच्या योजनांचा लाभ जेष्ठांनी घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मंडळातर्फे दरमहा 23 तारखेला मोफत मोतीबिंदू शिबीर घेण्यात येत असून नुकत्याच पार पडलेल्या शिबीरात कांताई नेत्रालयाचे तज्ञ डॉ. भरत साळवे व डॉ. प्रमोद जैन यांनी 200 रूग्णांची नेत्रतपासणी व औषधोपचार करण्यात आले.
100 रूग्णांची इतर आजारांवर झाली तपासणी
12 रूग्णांवर मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले. तर डॉ. आनंद धुत व डॉ.पंकज घोडके यांनी 100 रूग्णांची विविध आजारांवर तपासणी केली. मंडळाचे कार्याने मी भारवून गेलो असे अतुल कोगटा यांनी सांगितले. तर जी.जी.चौधरी यांनी जेष्ठांविषयी असलेले कायदे यांची सखोल माहिती दिली. मंडळासाठी 10 हजार फुट जागा व आईच्या नावाने एक लाख रूपये देण्याचे मंडळाचे अध्यक्ष यांनी जाहीर आश्वासन दिलेबद्दल त्यांचा सत्कार केला.
यशस्वितेसाठी यांचे परीश्रम
शिबीराच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष मदनलाल झवर, साहेबराव पाटील, सोनार सर, डॉ. बिचवे, पंढरी ठाकूर, गोकुळ फुलपगार, दिनेश जोशी, देवराम पाटील, सफदरखाँ पठाण, रघुनाथ बोरसे, शांताबाई पाटील, प्रभावती जोशी, मंडळाचे सचिव आधार गुरूजी यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल कोगटा, डी.टी.चौधरी, जी.जी.चौधरी, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र कासट, उपाध्यक्ष मदनलाल झवर, माजी अध्यक्ष डॉ. व्ही.आर.पाटील, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, गणेश दोडे गुर्जर मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील, देवराम पाटील, पत्रकार गोपाल सोनवणे यांनी अध्यक्ष शरदचंद्र कासट यांचा सत्कार तर दोन वर्षापासून गायीचे सेवा करणारे मुस्लिम समाजाच्या रऊफ मिस्तरी यांचादेखील सत्कार करण्यात आला.