जळगाव । गुढी पाढवा दिनापासून हिंदु नववर्षाला सुरुवात होते. हिंदु समाजात गुढी पाढव्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर येथे दरवर्षी स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. स्वागत यात्रेच्या नियोजनासंबंधी नुकतीच ह.भ.प.मंगेश महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून यात यात्रेविषयी नियोजन करण्यात आले. मंगळवारी 28 रोजी शहरातील विविध पंथ, संप्रदाय, उपासना केंद्र, गणेश मंडळे, सामाजिक संस्था, विविध देवस्थाने, धर्मप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने स्वागत यात्रोत्सवाचे आयोजन होणार आहे.
बैठकीत यांची होती उपस्थिती
हे यात्रोत्सवाचे 13 वे वर्ष आहे. नववर्ष शोभायात्रेस गायत्री मंदिरापासून प्रारंभ होणार असून दक्षीण मुखी मारुती मंदिर, ईच्छापुर्ती गणपती मंदिर, बॅकस्ट्रीट, जयप्रकाश नारायण चौक, टॉवर, सराफ बाजार मार्गे रथचौकात येणार आहे. नियोजन बैठकीस ओंकारेश्वर मंदिर संस्थानखे दिपक जोशी, छोटु नेवे, गिरीश कुलकर्णी, वृषाली देशपांडे, योगेश कासार, भैय्या घाडगे, अशोक माळी, संजय कोरके, मनोज चौधरी, बापु माळी, प्रणव जोशी, सांगर शिंपी, देवेश पाठक, चंद्रकांत दाभाडे, शशिकांत देशपांडे, भुषण जगताप, अमित पंडीत, सुमित पंडीत, वंसत सुतार, परिष तांबट, सुनिल शिंपी, बापु, सपके, प्रविण बारी, नंदुशुक्ल गुरुजी, राकेश शिरसाठ आदी उपस्थित होते. भाविकांनी स्वागत यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी 25 मार्च रोजी नियोजन संबंधी दुसर्या बैठकीचे आयोजन गणानाम भवन येथे करण्यात आली आहे.