भुसावळ। शहरातील सर्वात जुने आणि शेगावीचे संत श्री गजानन महाराजंच्या पदस्पर्शांने पावन झालेल्या जुन्या श्रीराम मंदीराच्या जीर्णोधार करण्यात येत आहे. मंदीराच्या नुतन वास्तुच्या भुमिपुजन सोहळयाचे ॠषिपंचमीच्या शुभमुहुर्तावर शनिवार 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे.
साधारणत: 150 वर्षे जुन्या असलेल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लक्ष्मी चौकातील श्रीराम मंदिरच्या जीर्णोध्दाराचे कार्य सुरु करण्यात येत आहे. फैजपुर येथील प.पु. महामंडलेश्वर स्वामी श्री जर्नादन हरिजी महाराज यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात येणार आहे. जुने श्रीराम मंदिर शहरासह राज्यातील अनेक भाविकांच्या श्रध्देचा,भावनेचा व आस्थेचा विषय आहे. या सोहळयास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीरामजी महाराज संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम चौक यांनी केले आहे.