श्रीलंका, नेपाळ, तिबेटमधुन आलेल्यांना नागरिकत्व द्या

0

अमळनेर येथील सभेत स्वराज हिंदचे योगेंद्र यादव यांची मागणी

अमळनेर-: मी राष्ट्रात नाही तर महाराष्ट्रात, संतांच्या भूमित, स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजींच्या भूमित उभा आहे. हिंदी माझी मातृभाषा तर मराठी माझी मावशी आहे. मागिल काही वर्षांपासून श्रीलंकेतून प्रताडीत होऊन भारतात येऊन बसलेले हिंदू तामिळी लोकांना, नेपाळ, तिबेटमधून आलेले प्रताडीत बौद्ध नागरिकांना अजूनही पंतप्रधानांनी नागरिकता दिलेली नाही, आधी त्यांना नागरिकत्व द्या अशी मागणी स्वराज हिंदचे योगेंद्र यादव यांनी आज अमळनेर येथे आयोजीत सभेत बोलतांना केली.

अमळनेर येथील छत्रपती शिवाजी नाट्यगृह येथे संविधान बचाव समितीतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यादव बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सीएए, एनसीआर, एनपीआर विरोधी लढाई हि धरतीमातेसाठीची लढाई आहे असे सांगत दिवार चित्रपटातील अभिताब व शशी कपूर यांच्या संवाद ऐकविला. संविधानाच्या पहिल्याच पानावर स्वातंत्र्याचा कलम 15, 19, 21 उल्लेख आहे. ज्यांनी या देशाचे संविधान वाचले नाही ते आज आझादी, स्वातंत्र्याच्या घोषणा देणार्‍यांना देशद्रोही ठरवत आहेत. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथिल भाषणात मी भारतीय असल्याचा गर्व आहे कारण आमच्या धरतीवर ज्यांनी ज्यांनी शरण मागितली त्यांना त्यांचा धर्म न विचारता शरण दिले आहे. लोकांनी विवेकानंदांचा हा विचार समजून घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

22 फेब्रुवारीपासून असहकार चळवळ

सीएए कायदा इतर देशातील नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी नाही तर मुस्लिम समाजाला वेगळं पाडण्यासाठी केलेला कायदा आहे. दि. 22 फेब्रुवारी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीपासून ते 23 मार्च भगतसिंग यांच्या शहिद दिनापर्यंत देशभर एनपीआर, एनआरसी, सीएए विरोधात असहकार आंदोलनाविषयी देशभर जनजागृती चळवळ उभारली जाईल असे योगेंद्र यादव यांनी जाहीर केले. सूत्रसंचालन प्रा अशोक पवार यांनी मानले.

मंचावर आ.अनिल पाटील,मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, करीम सालार, जयवंत पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, सचिन धांडे, रामभाऊ संदानशिव, गोकुळ बोरसे, मनोज पाटील, संदिप घोरोड़े, मुखतार खाटीक, भारती गाला, अ‍ॅड. शकील काझी आदी मान्यवर होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी लोकशाही बचाव नागरी कृती समितीचे रामभाऊ संदानशीव, प्रा.अशोक पवार, रियजुद्दीन मौलाना, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, अ‍ॅड. शकील काझी, गौतम सपकाळे, प्रा लिलाधर पाटील, पन्नालाल मावळे, अ‍ॅड. रज्जाक शेख, भारती गाला, फैय्याज पठाण, सत्तार मास्टर, शराफत अली, राजू शेख, नगरसेवक शेख हाजी, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, फिरोज पठाण, सिद्धार्थ संदांनशिव, प्रा शिवाजीराव पाटील, विश्वास पाटिल, शाहरुख सिंगर, इमरान खाटीक, मुझफ्फर हाजी, खालिद भाई, जुबेर अझहर, अय्युब पठाण, गुलाम नबी, नावेद शेख, शेर खा पठाण, रोनक शेख, शफी पहेलवान यांनी परिश्रम घेतले. समता कला मंच व शाहरुख सिंगर यांनी सांस्कृतिक विद्रोही गीते व देशभक्तीपर गीते सादर केली.