श्रीलंकेच्या खेळाडू संशयाच्या भोवर्‍यात?

0

कोलंबो । भारत आणि श्रीलंका यांच्यातील नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत यजमान संघाचा 0-3 असा पराभव झाला. या पराभवामुळे टीकेची झोड सहन करणार्‍या श्रीलंकेच्या संघाला आता आणखी धक्का बसला आहे. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने श्रीलंका क्रिकेटकडून या पराभवाचा विस्तृत अहवाल मागितला आहे. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दयासिरी जयासेकरा म्हणाले की, भारताकडून मिळालेल्या दारुण पराभवाबाबत श्रीलंका क्रिकेटला अहवाल देण्यास सांगितले आहे. आम्हाला संघाच्या क्शमतेवर पूर्ण विश्‍वास आहे. पण संघाच्या पराभवाची कारणे समजली पाहिजेत. संघाचा अपमानास्पद पराभव का झाला हे कळणे गरजेचे आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल असलेल्या संघाकडून श्रीलंका पराभूत झाली आहे हे जयासेकरा यांनी मान्य केले. जयासेकारा म्हणाले की, भारतीय संघ क्रिकेट जगतातला बलाढ्य संघ आहे. त्यामुळे संघाच्या पराभवाकडे त्यादृष्टीनेही बघायला पाहिजे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला दयनिय पराभव पत्कारायला लागला. शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये यजमान संघ एक डाव आणि काही धावांच्या पराभूत झाला होता.

याशिवाय भारतीय संघाने पहिल्यांदाच परदेश दौर्‍यात कुठल्या संघाला नेस्तनाबुत करण्याचा पराक्रम केला होता. कसोटी मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये श्रीलंकेचा संघ पराभव टाळण्यासाठी झगडत असलेला पहायला मिळाला. त्यांच्या एकाही खेळाडूला भारतीय खेळाडूंच्या आव्हानाचा सामना करता आला नाही.