श्रीलंकेत पुन्हा राजपक्षे यांचे सरकार; मोदींनी केले अभिनंदन

0

कोलंबो: आपले शेजारी देश श्रीलंकेमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान राजपक्षे यांच्या श्रीलंका पीपल्स पार्टीला भरघोष बहुमत मिळाले आहे. आज शुक्रवारी ७ ऑगस्टला निकालांमध्ये श्रीलंकेतील २२५ जागांपैकी केवळ श्रीलंका पीपल्स पार्टीने १४५ जागांवर विजय मिळवला. राजपक्षे यांच्या पक्षाला ५९.९ टक्के मते मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राजपक्षे यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासाठी काम केले जाईल असे मोदी म्हणाले, अशी माहिती राजपक्षे यांनी दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. श्रीलंकेतील नागरिकांच्या सोबत दोन्ही देशांमधील अनेक वर्षांपासून असलेले उत्तम संबंध आणि सहकार्य यांना पुढे नेण्यास एकत्र काम करण्यासाठी मी उत्साहित आहे. श्रीलंका आणि भारत हे चांगले मित्र आणि उत्तम सहकारी राष्ट्र आहेत,” असे राजपक्षे यांनी सांगितले.

महिंद्रा राजपक्षे यापूर्वी दहा वर्षे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षही होते. परंतु पक्षातील विरोधामुळे त्यांना पद सोडावे लागले. परंतु त्यानंतर त्यांचे बंधू राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले.

भारताची डोकेदुखी
महिंद्रा राजपक्षे हे चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. भारताचे चीनसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. त्यातच राजपक्षे हे चीनचे समर्थक असल्याने श्रीलंकेशीही तणाव वाढण्याचे चिन्हे आहे.