लंडन । टिम इंडीया आणि श्रीलंका यांच्या आज झालेला सामना सुरूवातीपासूनच चांगला रंगला होता. आयसीसी चॅम्पीयन ट्रॉपी 2017 च्या या आजच्या सामन्यात रोहित शर्मा (78 धावा, 79 चेंडू) व शिखर धवन (125 धावा, 128 चेंडू) या सलामीवीरांनी रचलेल्या भक्कम पायाच्या जोरावर चॅम्पियन्स करंडकामध्ये भारताने गुरूवारी श्रीलंकेसमोर धावांचे 322 आव्हान उभे केले. यात अखेरच्या षटकात केदार जाधवने जोरदार कामगीरी केल्याने 15 धावा भरून काढल्यात. चहापान नंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकन संघाची खराब सुरुवात झाली. भारताने दिलेल्या 322 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धक्का बसला आहे. श्रीलंकेचा सलामीवीर निरोशन डिकवेला याला भुवनेश्वर कुमारने तंबूची वाट दाखवली आहे. पहिल्या दहा षटकात लंकेला 1 बाद 44 धावांपर्यंतच मजल मारता आली आहे.
कोहली, युवराज सिंग यांचे अपयश
एकीकडे कर्णधार विराट कोहली हा भोपळाही न फोडता परतला; तर त्यानंतर आलेल्या युवराज सिंह (7 धावा, 18 चेंडू) यालाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. परंतु एकीकडून पडझड होत असतांना धवन याने स्थिरचित्ताने खेळत धावांचा ओघ आटू दिला नाही. युवराज बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या महेंद्रसिंह धोनी (63 धावा, 52 चेंडू) याने भारतीय डावास आकार दिला. याशिवाय, धोनी याने धवन बाद झाल्यानंतर केदार जाधव (नाबाद 25 धावा, 13 चेंडू) यांच्याबरोबर भारतीय आव्हान तीनशे धावांपलीकडे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याआधीच्या सामन्यात आक्रमक फटकेबाजी केलेल्या हार्दिक पांड्या (9 धावा, 5 चेंडू) याला या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. मात्र जाधव याने अखेरच्या षटकात दोन चौकार व एका षटकारासह धावसंख्या 321 पर्यंत पोहोचविले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेल्या दिशाहीन गोलंदाजीमुळे भारतीय आव्हान आणखी मोठे करण्यात फलंदाजांना यश आले. या स्पर्धेमध्ये भारताने याआधी पाकिस्तानला पराभूत केले असून हा सामनाही जिंकल्यास भारत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होईल. हळूवार सुरुवात करणार्या रोहितने लंकाच्या गोलांदाजी धुळ चाखायला दिली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेला कर्णधार विराट कोहली मात्र लगेच बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. रोहित-धवनने 24.5 षटकांत 138 धावांची भागिदारी केली. मागील सामन्याप्रमाणेच रोहित आणि शिखर प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेतला आहे.
श्रीलंका संघाचा मॅथ्यूज परतला
पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव करणारा भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात असल्याने श्रीलंकेसमोरील आव्हान अतिशय अवघड आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नसून पाकिस्तानविरुद्धचा विजयी संघ कायम आहे. तर श्रीलंकेच्या संघात अँजलो मॅथ्युज आणि थिसारा परेरा यांचे पुनरागमन झाले आहे. मॅथ्यूज परतल्यामुळे लंकेच्या मधल्या फळीला बळ मिळाले असल्याचे एकंदरीत दिसून येत होते.