मुरूड जंजिरा । श्रीवर्धन आगारातील शिवशाही बसच्या सेवेला प्रवाशांनी सर्वांत जास्त पसंती दिली. परंतु, शिवशाही च्या खासगी मालकाला त्यांचे महत्त्व नसल्याचा प्रत्यय येत आहे. शनिवारी आगारातील नियोजित विविध फेर्या सुटल्या नाहीत. त्यामुळे आरक्षण धारक प्रवासी व इतर अनेक लोकांचे अतोनात हाल झाले. राज्यातील विविध जिल्ह्यांत शिवशाहीच्या चालकांनी पगार थकीतचे कारण देत संप पुकारला होता. त्याचाच प्रत्यय श्रीवर्धन आगारात आला.
श्रीवर्धन आगारात शिवशाही खासगी मालकाच्या आहेत. रा.प.श्रीवर्धन आगारामध्ये प्रसन्ना पर्पलच्या 5 शिवशाही बसेस आहेत. त्यापैकी श्रीवर्धन- डोंगरी 3:45 वा.ची फेरी गेली. मात्र, शिवशाही बसेसचे चालक न आल्यामुळे 6:45 वा.ची.भाईंदर रद्द झाली व शिवशाही बसेसचे चालक न आल्यामुळ 7:15 नालासोपारा फेरीच्या वेळेवर निमआराम बस रा.प. चालकासह सोडण्यात आली. 13:00 ची नालासोपारा व 15:15 ची बोरिवली या दोन्ही शिवशाहीच्या फेर्या आहेत. त्यापैकी श्रीवर्धन बोर्ली मार्गे बोरिवली ही फेरी रद्द करण्यात आली. सदर ची शिवशाही बस भिवंडी मार्गावर सोडण्यात आली. पर्यायाने बोरिवलीच्या आरक्षण धारक प्रवाशांना बोर्ली स्थानकात दुपारी तीन वाजल्यापासून ताटकळत बसावे लागले.परंतु, आगारातून बस मात्र सुटली नाही. याचा प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. आगारातून शिवशाही बस न सुटल्याचे कारणांची एसटी प्रशासनाकडे विचारणा केली असता शिवशाही बसच्या कर्मचारी वर्गाने संप पुकारला होता. त्यामुळे सकाळी व दुपारी शिवशाही बस सुटल्या नसल्याचे सांगितले तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी प्रशासनाने एसटीचा चालक व सेमी बस वापरली, असे निदर्शनास येते. संपाविषयी शिवशाहीच्या अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संप झालाच नाही, गाड्यांचा तांत्रिक दोष आहे, गाड्याचे टायर खराब झाले आहेत असे अनपेक्षित उत्तरे दिली. एकंदरीत शिवशाहीच्या अधिकारी वर्गास एसटी व एसटीच्या प्रवाशांविषयी अनास्था असल्याचे स्पष्ट निदर्शनास आले.
शिवशाही बस न सुटल्यामुळे प्रवाशांना होणार त्रास कुणीच विचारात घेत नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. कामगिरीवरती गैर असलेल्या कर्मचारी वर्गावर शिवशाही सेवा पुरवणारी कंपनी काय कारवाई करते, असा प्रश्न जनता विचारत आहे .
आज सकाळपासून शिवशाहीच्या कर्मचारी वर्गाने विविध नियोजित फेर्या वरती दांडी मारली. त्यामुळे आम्हाला आमच्या सेमी बसेस व चालक वापरून नियोजित नियते पूर्ण करावी लागली. आगारातील शिवशाही सेवा पुरवणार्या गाड्या खासगी मालकाच्या आहेत. त्यामुळे संप करणार्या कर्मचार्यांवर आम्ही कारवाई करू शकत नाही. परंतु, सदरचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल .
रेश्मा गाडेकर (आगार प्रमुख श्रीवर्धन )