श्रीवर्धन-म्हसळा रोडवर केरोसीनचा टँकर पलटी

0

श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्याला किरकोळ केरोसीन विक्रीसाठी वाशीवरून श्रीवर्धनला पुरवठा शाखेची केरोसीनचा टँकर ब्रेकफेल होऊन सकाळी श्रीवर्धन म्हसळा रोडवर पलटी झाला. यामधील अंदाजे तीन हजार लिटर केरोसीन वाहून गेले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, तर उर्वरित केरोसीन दुसर्‍या छोट्या वाहनांच्या आधारे उपसण्याचे काम सुरु होते. अपघातामध्ये केरोसीन टँकरचा चालक साहेबराव मारुती राठे रा. नगर व त्यांचे सहकारी लक्ष्मण कोंडीबा जायखे, किसान मारुती कासुटे, संदीप लहू गायखे याना गंभीर दुखापत झाली असून त्यांना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रीवर्धन पोलीस ठाण्यात मोटार अपघात म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार 1867 करत आहेत. दरम्यान केरोसीन उपसा करताना पुरवठा शाखेचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे समजते.