श्रीशांतला मिळाला दिलासा, तो म्हणाला ‘गॉड इज ग्रेट’

0

तिरुअनंतपुरम । स्पॉटफिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदीची कारवाई करण्यात आलेल्या शांताकुमार श्रीशांतला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयने त्याच्यावर घातलेली आजीवन बंदी हटवली आहे. श्रीशांतवर ही बंदीची कारवाई आयपीएलच्या सहाव्या सत्रातील सामन्यांदरम्यान झालेल्या स्पॉटफिक्सिंगच्या प्रकरणात घालण्यात आली होती. श्रीशांतने यावर्षी केरळमधील एर्नाकुलम क्लबसाठी दोन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्यांमधून पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे याआधी म्हटले होते. त्याआधी श्रीशांतला स्कॉटलंडमधील एक क्लबसाठी खेळायचे होते. पण बीसीसीआयने त्यावेळी श्रीशांतला ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या श्रीशांतने, आजीवन बंदी घातल्याचे कुठलेही पत्र दिलेले नाही, त्यामुळे अंपायर मला खेळण्यापासून रोखू शकतील का?. तिहार जेलमध्ये असताना मला निलंबनाचे एक पत्र मिळाले होते. निलबंनाचे पत्र 90 दिवस ग्राह्य धरले जाते. बंदी सदर्भात अधिकृतपणे काही चर्चा झाली नव्हती. मी मूर्ख होतो म्हणून इतके दिवस क्रिकेट खेळलो नाही. एका दहशतावाद्याला देत नाही अशी वागणूक मला दिली. असे म्हटले होते. आयपीएलच्या 2013 सत्रातील सामने शेवटच्या टप्प्यातील सामन्यांदरम्यान आलेल्या स्पॉटफिक्सींगच्या बातम्यांनी खळबळ उडाली होती. 2013 मध्ये श्रीशांत आणि राजस्थान रॉयल्स संघातील त्याचे दोन सहकारी अजित चंदीला आणि अंकित चव्हाणला स्पॉटफिक्सींगच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मुंबईत अटक केली होती.

10 जून 2013 मध्ये श्रीशांत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाणला जामीन मिळाला. दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल करत या तिघा क्रिकेटपटूंच्या जोडीने आणखी 39 जणांना या प्रकरणात आरोपी केले होते. अटक केलेले तिघे क्रिकेटपटू केवळ सट्टेबाजीच नाही तर स्पॉट फिक्सींगही करत होते असा दावा दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी केला होता. दोन वर्षानंतर 25 जुलै रोजी पटियाला हाऊस न्यायालयाने या तिघांना निर्दोष सोडले. न्यायालयाने निर्दोष सोडल्यामुळे इतर ठिकाणी खेळण्यासाठी श्रीशांतने बीसीसीआयकडे परवानगी मागितली. मात्र बीसीसीआयने श्रीशांतची ही विनंती फेटाळून लावताना, भ्रष्टाचारासाठी सहिष्णुताच्या नितीशी समझोता करणार नसल्याचे म्हटले होते. यासंदर्भात बीसीसीआयने श्रीशांतला पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता.

अन् खळबळ उडाली
सट्टेबाजी प्रकरणाचा उलगडा झाला त्यादिवशी अभिनेता संजय दत्त न्यायालयात सर्मपण करणार होता. त्यामुळे सर्व प्रसिद्धी माध्यमांचे लक्श त्या बातमीकडे होते. पण आयपीएलमधील स्पॉटफिक्सींगमध्ये श्रीशांतसह तिघे क्रिकेटपटू सहभागी असल्याचे वृत्त आल्यावर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात एका आठवड्यानंतर आणखी एक मोठे नाव जोडले गेले. बीसीसीआयचे तत्कालीन प्रमुख एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरूनाथ मयप्पनला आयपीएलमधील सट्टेबाजी आणि स्पॉटफिक्सींगमधील कथित सहभागाबद्दल पोलिसांनी अटक केली.

त्यादिवशी सगळ्यांचे लक्श अभिनेता संजय दत्तच्या न्यायालयीन सर्मपणाकडे होते. पण आयपीएलमधील स्पॉट फिक्सीमगमध्ये दोघा क्रिकेटपटूंसह श्रीशांतचा सहभाग असल्याचे वृत्त आल्यावर एकच खळबळ उडाली होती
25 जुलै 2015 रोजी पटीयाला हाऊस न्यायालयाने दिल्ली पोलिसांना झटका देताना श्रीशांतसह अजिंत चंडीला आणि अंकित चव्हाणवर लावलेले सर्व आरोप रद्दबातल ठरवत, पुराव्याअभावी या तिघांची निर्दोष मुक्तता केली.
पटीयाला हाऊस न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावर आजीवन प्रतिबंध हटवण्यासंदर्भात बीसीसीआयला पत्र लिहीले होते. पण 18 एप्रिल 2017 रोजी झालेल्या बैठकित बीसीसीआयने श्रीशांतवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला.

एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्यास दिला होता नकार
गुरूनाथ मयप्पनला अटक झाल्यावर श्रीनिवासन यांच्यावर बीसीसीआयचे अध्यक्शपद सोडण्यासाठी दबाब येऊ लागला. पण श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, त्याचवेळी बीसीसीआयचे सचिव, खजीनदार आणि आयपीएलच्या अध्यक्शांनी आपापले पद सोडले. श्रीनिवास त्यावेळी तात्पुरते पद सोडण्यास तयार होते. आयपीएलमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने एक चौकशी समिती नेमली. पण चौकशीला सुरूवात होण्याआधीच, राजस्थान रॉयल्स फ्रॅचायझीचे मालक राज कुंद्राने आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सींग केल्याची कबुली दिली असल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहिर केले.