जळगाव । रुक्मणी फौंडेशनचे उपाध्यक्ष सुनील श्रीश्रीमाळ यांनी त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी लग्नाच्या वाढदिवसी म्हणजेच 4 मे रोजी सुनील श्रीश्रीमाळ व त्यांची पत्नी संगीता श्रीश्रीमाळ यांनी विविध प्रकारचे समाजकार्य करून हा लग्नाचा वाढदिवस संस्मरणीय केला. श्रीश्रीमाळ दांम्पत्याने सकाळी 9 वाजता पानझारपोळ संस्थानातील गायींसाठी लापाशी, ढेप, चारा आदींचे दान केले.
यानंतर त्यांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेता परिसरातील विविध भागांत प्राणी, पक्षी यांची तहान भागावी यासाठी पाण्याची टाक्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संघपती दलूभाऊ जैन, यीन महसूलमंत्री जिनल जैन, बाबूशेठ श्रीश्रीमाळ, मिलींद मलबारी, सिद्दार्थ जैन, अमित नवघरे, शुभांगी जैन, सुशील अग्रवाल आदि उपस्थित होते.