श्रीसाई सेवा मंडळातर्फे १० अाॅक्टाेबरपासून बळीरामपेठेतील साई मंदिरात महाेत्सव

0

जळगाव : बळीरामपेठेतील साई मंदिरात १० अाॅक्टाेबरपासून साईबाबा पुण्यतिथी महाेत्सवाचे ६४ वे वर्ष साजरे करण्यात येणार अाहे. या निमीत्ताने श्रीसाई सेवा मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले अाहे. कार्यक्रमात १० राेजी सकाळी ९.३० वाजता पुजारंभ, धून प्रज्वलन तसेच महाेत्सवाचे उद‌्घाटन अामदार स्मिता वाघ यांच्या हस्ते हाेईल. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अॅड. सुशील अत्रे उपस्थित राहणार अाहेत. १० ते २१ अाॅक्टाेबर दरम्यान अायाेजीत महाेत्सवात स्थानिक मंडळांचे भजन दरराेज दुपार ४ वाजता हाेणार अाहे. रात्रीच्या वेळेस हाेणाऱ्या कार्यक्रमांतर्गत ११ राेजी मुबई येथील श्रध्दा देशपांडे – शुक्ल यांचे कीर्तन, १२ राेजी मुंबईच्या कल्याणी पांडे – साळुंके यांचे गायन कार्यक्रम, १३ राेजी काैस्तुभ अापटे यांचा गायन तर १४ राेजी अाैरंगाबाद येथील प्यारेलालजी माेरे यांचा वन मॅन शाे भजनसंध्या हा कार्यक्रम हाेणार अाहे.  कार्यक्रमात अाशिष राणे (तबला), मंदार दिक्षित (हार्माेनिअम), सिध्देश देशमुख ( तबला), गिरीश माेघे (हार्माेनिअम) अशी संगीत साथ करणार अाहेत.

विजयादशमीनिमीत्त १८ राेजी मंदिरासमाेर दुपारी १२ ते २ यावेळेत नैवेद्य अन्नदान, २० राेजी सायंकाळी ४.३० ते ९ यावेळेत शहरातील प्रमुख मार्गावरून साई पादुकांची सवाद्य पालखी मिरवणूक, २१ राेजी व्दादश गाेपाळकाला व तीर्थप्रसादाने महाेत्सवाची सांगता हाेणार अाहे, असे श्री साई सेवा मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काशिनाथ बारशे व विश्वस्त मंडळाने कळवले अाहे.